बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशभरात कोरोनानंतर ‘या’ रोगाची साथ; 100 हून अधिक मृत्यू

मुंबई | गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दोन्ही लाटेने हाहाकार माजवला होता. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. देशातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असताना आता देशात एका साथीच्या रोगाने डोकं वर काढलं आहे.

देशातील अनेक राज्यात डेंग्यू आणि व्हायरल फिव्हरच्या रूग्णांमध्ये वाढ झाल्याचं दिसतंय. उत्तर भारतात डेंग्यूची लागण मोठ्या प्रमाणावर झाली आहे. डेंग्यूच्या साथीमुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये आतापर्यंत 100 हून अधिक बळी गेल्याची माहिती समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये डेंग्यूमुळे आतापर्यंत 75 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर मध्यप्रदेशमध्ये देखील डेंग्यूने हाहाकार माजवला आहे. तर डेंग्यूमुळे दिल्ली आणि इतर राज्यात आरोग्य व्यवस्थेवर ताण आल्याचं दिसून येतंय.

दरम्यान, महाराष्ट्रात देखील डेंग्यूच्या साथीने थैमान घातलं आहे. नागपूर, मुंबई आणि पुण्यात डेंग्यूची रूग्णसंख्या वाढत आहे. डेंग्यु हे डासांमुळे होणारं व्हायरल इन्फेक्शन आहे. ज्यात तीव्र ताप, डोकेदुखी, अंग आणि सांधेदुखी, त्वचेवर पुरळ येणं अशी लक्षणं दिसतात.

थोडक्यात बातम्या-

दहशतवादी झाले मंत्री-संंत्री! तालिबानच्या नव्या मंत्रिमंडळाची घोषणा

आरोग्य केंद्रे बंद करून मंदिरे उघडू का?- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनाची तिसरी लाट येणार आहे, असं नाही, आली आहे- किशोरी पेडणेकर

‘माझ्यावर झालेल्या हल्ल्यामागे फेरीवाला नाही यामागे…’; कल्पिता पिंगळेंचा मोठा गौप्यस्फोट

चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More