कधीही लाॅकडाऊन न लागलेल्या देशात कोरोनाचा उद्रेक, समोर आली धक्कादायक आकडेवारी
नवी दिल्ली | कोरोना महामारीनं गेल्या दोन वर्षांपासून हाहाकार माजवला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोना शिरकाव कमी होत आहे. कोरोनाची लाट आटोक्यात येत असल्यामुळे नागरिकांनाही काहीशा प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
कोरोना नियंत्रणात येत असलेला असतानाच अनेक ठिकाणी कोरोनाचा उद्रेकही पहायला मिळत आहे. चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. चीनपाठोपाठ दक्षिण कोरियातही कोरोनानं थैमान घातलायला सुरुवात केली आहे.
कोरियाने कधीही लॉकडाऊन लागू केलं नाही. दरम्यान येथे वृद्धांना लक्ष्य करून वापरल्या जाणार्या बूस्टर डोसच्या पुरवठ्यावर भर देण्यात आला. आता त्याच ठिकाणी कोरोनाचा कहर पहायला मिळत आहे. दक्षिण कोरियामध्ये गुरुवारी कोरोनाचे 6 लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळले.
दरम्यान, कोरियन प्रशासनानं बाधित व्यक्तीची प्रकृती गंभीर होण्यापूर्वी जोखीम असलेल्या प्रकरणांची ओळख पटवून रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
थोडक्यात बातम्या –
सर्वात मोठी बातमी! ठाकरे सरकारकडून होळीचे सगळे निर्बंध मागे
“मुलीवर लैंगिक अत्याचार करताना तीनं अंतर्वस्त्र घातली असली तरी…”; न्यायालयाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक
…तर कुणीही सहजपणे तुमच्या प्रेेमात पडेल, तज्ज्ञांनी सांगितली ट्रीक
“महाराष्ट्रात भाजपचं पूर्ण बहुमतानं सरकार आणणार”
Comments are closed.