बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना पाठोपाठ अमरावतीत ‘या’ आजाराचा शिरकाव!

अमरावती | कोरोनासारखीच लक्षणे असणाऱ्या ‘सारी’ या संसर्गाने आता अमरावती जिल्ह्यात चांगलाच धुमाकुळ घालायला सुरवात केली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीत तब्बल 388 सारीच्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे संपुर्ण जिल्हा चिंताग्रस्त झाला आहे. या रुग्णांची चाचणी करण्यात आल्यानंतर त्यातील एकुण 144 रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत.

सारी या आजाराच्या 6 ते 7 रुग्णांची रोज नोंद होत आहे. यावर्षी दोनच महिन्यात 388 सारीच्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षभरात 2600 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे. तर यामध्ये 255 रुग्णांचा बळी गेला आहे. यामुळे कोरोनासोबत आता या आजारानेही नागरिक हवालदिल झाले आहे.

सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे ही सगळी सारीची लक्षणे कोरोनासारखीच असल्याने सुरवातीच्या काळात ओळखणं फार अवघड झालं होतं. पण, नंतर सारीकडे आरोग्य यंत्रणेद्वारे विशेष लक्ष घालण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर पुन्हा सारीकडे दुर्लक्ष झालं, खासगी रुग्णालयात सारीच्या रुग्णाला कोरोनाचा रुग्ण समजून उपचार केलं जात असल्याची बरीच उदाहरणं पुढे आली आहेत.

सध्या सारीच्या आजारासंदर्भात मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आलं असून काळजी घेतल्या जात आहे. ग्रामीण भागात मात्र अजूनही ओपीडीमध्ये उपचार केले जात आहे. यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीत कोरोना चाचणी केली असता त्यामध्ये 600 पेक्षा अधिक सारीचे रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत.

थोडक्यात बातम्या

‘सर्व पेट्रोल पंपांवरील मोदींचा फोटो असणारे होर्डिंग हटवा’; निवडणूक आयोगाचा आदेश

“उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत”

…अन् लेकीचं शीर कापून तो थेट पोलीस ठाण्याकडे निघाला; घडलेला प्रकार पाहून पोलिसही हादरले

“मोदी सत्तेत आल्यापासून भारतातील स्वातंत्र्य कमी झालं”; ‘ग्लोबल फ्रिडम’चा अहवाल

‘कल हो ना हो’ मधील जियाला ओळखणं झालंय कठीण, पाहा आता कशी दिसते

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More