बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सांगली पॅटर्न; विनाकारण घराबाहेर पडाल तर कोलांटउड्या माराल…!

सांगली  | घराबाहेर पडू नका असं पोलिसांनी नागरिकांना कितीही सांगितलं तरी नागरिक ऐकण्याचं नाव घेत नाहीयेत. अशाच विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांसाठी सांगली पोलिसांनी आता आपला शिक्षेचा पॅटर्न चेंज केला आहे.

विनाकारण जर कुणी घराबाहेर पडताना दिसला तर त्याला कोलांटउड्या मारण्याची शिक्षा पोलिस देत आहे. कोलांटउड्या मारल्यानंतर त्याला समज देऊन पोलिस सोडत आहेत.

दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण अधिक वाढत आहेत. अशा परिस्थितीत लॉकडाऊन अतिशय काटेकोरपणे पाळणं आवश्यक आहेत. बहुसंख्य नागरिक लॉकडाऊनचं अतिशय व्यवस्थित पालन करत आहेत. मात्र समाजातील काही मोजकी लोकं काहीतरी कारण सांगून घराबाहेर पडण्याचा बहाणा शोधून काढतात. अशा नागरिकांविरोधात सांगली पोलिसांनी मोहिम सुरू केली आहे.

दरम्यान, सांगलीच्या इस्मामपूरमध्ये कोरोनाचे 25 रूग्ण सापडले होते. या प्रकाराने सांगली जिल्ह्यात एकट माजली होती. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. ही परिस्थिती अशीच रहावी आणि कोरोनाचा आता रूग्ण सापडू नये याची काळजी प्रशासन घेत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

मुंबईचं इटली होणार, आपल्याला खंबीर नेतृत्वाची गरज- रंगोली चंडेल

भारतात वटवाघळामुळे कोरोना पसरला का? ICMR चे संशोधक म्हणतात…

महत्वाच्या बातम्या-

झारीतले शुक्राचार्य कोण आहे? म्हणत पंकजा मुंडे उसतोड कामगारांच्या प्रश्नावर आक्रमक

पाकिस्तानने भारताकडे मागितला मदतीचा हात; ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पुरवण्याची केली विनंती

मला माफ करा मी हरलो; जितेंद्र आव्हाड यांची भावनिक फेसबुक पोस्ट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More