नागपूर महाराष्ट्र

सिनेमागृहात बिनधास्त न्या बाहेरील खाद्यपदार्थ; राज्य सरकारची घोषणा

नागपूर | सिनेमागृहात बाहेरील पदार्थ नेणाऱ्याला आता कोणीही अडवू शकणार नाही, असं करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून महामार्गावरील फुडमाॅल आणि सिनेमागृहात बाहेरील खाद्य पदार्थ खाण्यास बंदी आणि तेथील पदार्थ जादा दराने होणारी विक्री यावर भाष्य केलं होतं.

दरम्यान, सरकारनं केलेल्या कायद्यामुळं 1 ऑगस्टपासून एकाच वस्तूची किंमत सगळीकडे सारखी असेल, असं रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलंय.

महत्त्वाच्या बातम्या–

-…म्हणून संतापलेले जितेंद्र आव्हाड पत्रकाराला म्हणाले मूर्ख!

-संभाजी भिडे आणखी अडचणीत; उच्च न्यायालयात याचिका दाखल

-सरकार शेतकरी नेत्यांचे फोन टॅप करत आहे; राजू शेट्टींचा आरोप

-रायगडावर बीडच्या वृद्ध जोडप्यानं अनुभवला रितेशचा दिलदारपणा!

-तुकाराम महाराजांचा खून झाला होता; जितेंद्र आव्हाड यांचा दावा

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या