बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“15 वर्षात आम्ही एकत्र अनुभव, आनंद आणि हास्य शेअर केलं पण आता…”

मुंबई | अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. चाहत्यांना या दोघांच्या घटस्फोटाच्या बातमीने मोठा धक्काच बसला आहे. आमिर-किरणचा 15 वर्षांचा संसार मोडल्याने चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

आमिर आणि किरण यांनी एक जॉइंट स्टेटमेंट जारी करत त्यांच्या घटस्फोटाविषयी माहिती दिली आहे. दोघांनी एकमेकांच्या समहमतीने घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं आहे. किरण रावसह आमिर खानचे दुसरं लग्न होतं. घटस्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे कारण समोर आलेलं नाही. मात्र दोघेही आता पती पत्नीसारखे राहत नसलो तरी मैत्री कायम राहिल, असं आमिर खानने सांगितलं आहे.

15 वर्षात आम्ही एकत्र अनुभव, आनंद आणि हास्य शेअर केलं आहे आणि आमचं नातं केवळ विश्वास, सन्मान आणि प्रेमामुळं वृद्धिंगत झालं आहे. पण आता आम्हाला आयुष्यात नवीन अध्यायाची सुरुवात करायची आहे- आता नवरा बायको म्हणून नाही तर सह-पालक आणि एकमेकांचं कुटुंब म्हणून राहू, असं त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, किरणच्या आधी आमिर खानचं लग्न रीना दत्तासोबत झालं होतं. 2000 साली त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर किरण राव आणि आमिर खान यांचं लग्न झालं. केवळ एका फोनच्या संभाषणानंतर आमिर खान आणि किरण राव मनाने एकमेकांच्या जवळ आले होते.

थोडक्यात बातम्या- 

“अण्णा हजारे 7 वर्षांच्या कुंभकर्णीय झोपेतून खडबडून जागे झालेत”

बंडातात्या यांच्यावर केलेल्या कारवाईचा देवेंद्र फडणवीसांकडून निषेध, म्हणाले…

सैराट फ्रेम तानाजीनं केलं न्यूड फोटोशूट; सोशल मीडियावर तुफान चर्चा

आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट; 15 वर्षांचा संसार मोडला

समुद्राच्या मध्यभागी उडाला आगीचा भडका; आग विझवण्याचा थरार कॅमेऱ्यात कैद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More