बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ लोकांना दारूपासून जास्त धोका; अभ्यासातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर

मुंबई | आताच्या युगात मद्य पिणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. फार कमी वयातच बरेच तरुण आता व्यसनांच्या आहारी जात आहे. आता वैैदकीय सर्वेक्षणातून (Medical Report)  एक धक्कादायक आणि थोडीशी दिलासादायक माहिती समोर आली आहे. जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे (Jaslok Hospital and Research Center) जनरल मेडिसिन कन्सलटंट डॉ. रोहन सेकीरा (Dr. Mohan Sekira) यांच्या मते, आपले शरीर एका तासात फक्त एक पेग (Peg)आणि आणि संपूर्ण दिवसात 3 पेग पचवू शकतात.

वैदकीय जनरल द लॅन्सेटने प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार, 40 वर्षाखालील लोकांना त्यांनी कमी आणि योग्य प्रमाणात मद्याचे सेवन केले, तरच मद्यपानाचे काही फायदे उद्भवू शकतात. पण, त्याचे प्रमाण वाढल्यास 22 दुर्धर आजारांची परिस्थिती उद्भवू शकते.

परंतु 40 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना नियमित आणि योग्य प्रमाणात मद्यपान केल्याने काही फायदे उद्भवू शकतात. नियमित आणि एका मात्रेत मद्य पिल्यास हृद्यविकार, स्ट्रोक आणि मधुमेहाचा धोक कमी होतो. नुसत्या अल्कोहोलच्या सेवानाने 2020 साली 134 कोटी पेक्षा जास्त लोकांनी आपला प्राण गमावला आहे.

मृत्यू झालेल्या लोकांमध्ये 15 ते 49 वयोगटीतील व्यक्तींचा जास्त प्रमाणात सामावेश आहे. जागतिक आरोग्याची हानी कमी करण्यासाठी 15 ते 49 वयोगटातील नागरीकांनी मद्यपान न करण्याचं आवाहन केलं गेलं आहे. तर त्यांनी मद्यपान करु नये यासाठी कठोर पावले उचलण्याची शिफारस करण्यात आली आहे.

वॉशिंगटन विद्यापीठातील (Washington University) इन्सिटीट्यूट फॉर हेल्थ मेट्रीक्स अँड इव्हॅल्युएशन (IHME) च्या प्राध्यापक आणि वरिष्ठ लेखिका इमॅन्युला गाकीदौ यांच्या मतानुसार, 15 ते 49 वयोगटातील व्यक्तिंमध्ये सुमारे 60 टक्के लोकांचे मृत्यू अल्कोहोल – संबंधित दुखापती, अपघात, आत्महत्या आणि हत्या यामुळे संभवतात.

थोडक्यात बातम्या – 

“डिलिव्हरीचा मुहूर्त ठरलेला दिसत नाही, मंत्र्यांचा पाळणा कधी हलणार?”

नीरव मोदीला ईडीचा जोर का झटका; केली ‘ही’ मोठी कारवाई

शिंदे गटात सहभागी झालेल्या खासदाराचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

“शिवसेना आमदार, खासदारांनी रशिया- युक्रेन युद्धाकडून शिकावं”

सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार ‘गोष्ट एका पैठणीची’ला जाहीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More