बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनावर मात करत वसईतील 25 वर्षीय तरुणानं माऊंट एव्हरेस्टवर फडकवला तिरंगा!

मुंबई | हर्षवर्धन जोशी या वसईतील 25 वर्षीय तरुणानं कोरोनावर मात केल्यानंतर जगातील सर्वोच्च शिखर ‘माऊंट एव्हरेस्ट’ सर करण्याची कामगिरी केली आहे. काही दिवसांपुर्वी त्याला कोरोना झाला होता. त्यानंतर कोरोनावर मात करत त्यानं माऊंट एव्हरेस्टच्या दिशेनं पाऊल टाकलं.

6 एप्रिलपासून ते 23 मे पर्यंतच्या या काळात त्याने ही चढाई पुर्ण केली आहे. चढाई करत असताना त्याला कोरोनानं ग्रासलं. तेव्हा त्यानं स्वतःला बेस कॅम्पमध्ये आयसोलेट करून घेतलं. 8 दिवसानंतर तो कोरोनामुक्त झाला. त्यानंतर त्यानं एव्हरेस्टवर चढाई पुर्ण केली. या मोहिमेत त्याला 60 लाख रुपये खर्च आला आहे.

माऊंट एव्हरेस्टवर चढायचं हे त्याचं जुनं स्वप्न होतं. यासाठी आर्थिक पाठबळही भरपूर प्रमाणात लागणार होतं. तरीही त्याने जिद्दीने यासाठी स्वतःची बचत केलेली काही रक्कम, मित्र, काही कंपनी, नातेवाईक तसेच वसई-विरार शहर महानगरपालिका यांनाही मदतीसाठी आवाहन केलं होतं. त्यावेळी वसई-विरार महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने त्यास चार लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली होती. त्यानंतर त्यांने अनेक अडचणीचा सामना करत हा कारनामा केला आहे.

वसईतील हर्षवर्धन जोशी या तरुणाने कोरोनावर मात करून जगातील सर्वोच्च शिखर ‘माऊंट एव्हरेस्ट’ सर करण्याची अविश्वसनीय कामगिरी बजावली आहे. हर्षवर्धनने प्रचंड जिद्द अन् धाडस दाखवून केलेला हा अतुलनीय पराक्रम समस्त भारतीयांची मान अभिमानाने उंचावणारा आहे, असं ट्विट अनिल देशमुख यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘कोरोनाची तिसरी लाट आली तरी…’; उद्धव ठाकरेंचा उद्योजकांना सल्ला

‘महागाईच्या भडक्यात बेरोजगारीची लाट, लोकांना काम देण्याची गरज’; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

“बाळासाहेबांनी काँग्रेसला गाडून टाका सांगितलं होतं, खुर्चीसाठी तुम्ही त्यांचे विचारच गाडून टाकले ”

‘दररोज सामन्यापुर्वी…’; सिक्सर किंग युवराजने दिला भारतीय संघाला मोलाचा सल्ला

‘बिल्डरने वेळेवर घर दिलं नाही तर…’; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More