बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोबाईलच्या अतिवापरामुळे कुटुंबातील संशयी प्रवृत्ती बळावल्या 5 महिन्यात तब्बल एवढ्या तक्रारी

नागपूर | लाॅकडाऊनमुळे सर्व लोक घरात आपल्या कुटुंबियांबरोबर बंदिस्त आहेत. याच काळात मोबाईल व सोशल मीडिया हा मोठा आधार असल्याचं दिसून येत आहे. घरातील सर्वच व्यक्ती मोबाईल व सोशल मीडियावर बहुतांश वेळ घालवत आहेत. याचाच दुष्परिणाम होताना पाहायला मिळत आहे.

नागपूरमध्ये नागपूर पोलिसांचं भरोसा सेल घरगुती तक्रारींसाठी कार्यरत आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे संशयी प्रवृत्ती बळावली असल्याचं गेल्या काही महिन्यांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यादरम्यान संशय आल्यामुळे पाच महिन्यात तब्बल 704 तक्रारी भरोसा सेलकडे दाखल झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, कोरोना काळात मोबाईलचा अतिवापर तसेच मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असताना पाहायला मिळत आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच नागरिक मोबाईलच्या आहारी गेल्याने ही गंभीर समस्या उद्भवली असल्याचं मत सोशल मीडिया तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. मागच्या दोन महिन्यांमध्ये नागपूरमध्ये 236 संशयाच्या तक्रारी दाखल झाल्याने परिस्थिती गंभीर बनत चालली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

पती-पत्नीमध्ये लॉकडाऊन काळात भांडणं होत असल्याची बातमी समोर येत असतानाच आता मोठ्या प्रमाणात मोबाईलच्या अतिवापरामुळे संशय निर्माण होत असल्याने चिंतेचं वातावरण पसरलं आहे. या सर्वांमध्ये मोबाईलचा अतिवापर करणे टाळणं ही काळाची गरज असल्याचं मत पोलिसांनी व्यक्त केलं आहे.

थोडक्यात बातम्या –

नागपूरची वाटचाल कोरोनामुक्तीकडे; आज फक्त 196 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

देशातील ‘या’ राज्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; उद्यापासून होणार अनलॉकला सुरुवात

पुणेकरांसाठी खूशखबर! अखेर ‘या’ मार्गे पुण्यात झालं मान्सूनचं आगमन

टीम इंडीयाच्या ‘या’ अनुभवी खेळाडूनं किचनमध्ये दाखवली आपल्या हाताची जादू; पाहा व्हिडीओ

WTC च्या फाईनलची तयारी करणाऱ्या विराटबद्दल अनुष्कानं भन्नाट कॅप्शन देत पोस्ट केला ‘हा’ फोटो

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More