Loading...

नरेंद्र मोदींच्या ‘या’ सल्ल्यावर खासदार असदुद्दीन ओवैसी भडकले!

नवी दिल्ली | युवा जनसंख्येच्या क्रयशक्तीचं महत्व मोदींना माहित नसून ते स्वत:च्या जबाबदारीहून पळ काढत आहेत, अशी टीका एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य दिनी देशभरातील लोकांना छोटी कुटुंब ठेवण्याचा सल्ला दिला होता. यानंतर असदुद्दीन ओवेसींनी नरेंद्र मोदींवर शरसंधान साधलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

Loading...

छोटे कुटुंब असणं हीच खरी देशभक्ती आहे, असं वक्तव्य मोदींनी गुरुवारी केलं होतं. तसेच अनियंत्रित लोकसंख्या वाढीला आळा घालण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली होती. यावरच ओवेसींनी टीका केली आहे.

दरम्यान, देशातील आताची युवा लोकसंख्या २०४० पासून उत्पादन क्षम असणार आहे. तेव्हा या जनतेचा योग्य प्रकारे वापर कसा करून घ्यायचा हे पंतप्रधानांना माहित नाही, असं ओवैसींनी म्हटलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-“दबावशाही, झुंडशाही हे तर शिवसेनेचं वैशिष्ट्य”

-सैफ अली खानने स्मिता तांबेला दिली शाबासकी, म्हणाला…

-धनंजय मुंडे शेतकऱ्यांना फक्त 10 रूपयांत जेवण देणार…!

Loading...

-काँग्रेसला 70 वर्षांत जमलं नाही… आम्ही 75 दिवसांत करून दाखवलं- अमित शहा

“संपूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आम्हाला प्राण्यांसारखं पिंजऱ्यात ठेवलंय”

Loading...