देश

नागरिकत्व कायद्याविरोधात ओवैसींची सर्वोच्च न्यायालयात

नवी दिल्ली | नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला संसदेत मंजुरी मिळाल्यानंतर आणि कायदा तयार झाल्यानंतर देशात अनेक ठिकाणी हिंसाचार सुरु झाला. नागरिकत्व विरोधी कायद्याविरोधात विरोधी पक्षांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांनी रस्तावर उतरत विरोध करत आहेत. या कायद्याविरोधात खुद्द एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात असदुद्दीन ओवैसी यांनी सर्वोच्च न्यायलयात एक याचिका दाखल केली आहे, असं वकील निजाम पाशा म्हणाले असल्याची माहिती एएनआय या वृत्त संस्थेनं दिली आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

संसदेतही ओवेसी यांनी या कायद्याला विरोध करत या विधेयकाची प्रत फाडली होती. तर दुसरीकडे इंडियन यूनियन मुस्लिम लीगनेही नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या