बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर तुम्ही माणूस म्हणवण्याच्या लायकीचे नाहीत- असदुद्दीन ओवैसी

हैद्राबाद | अहमदाबादमधील एका तरूणीने नवऱ्याच्या जाचाला कंटाळून साबरमती नदीत उडी घेत आत्महत्या केली होती. तिने आत्महत्येआधी एक व्हिडिओ शूट केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हयरल झाला. आयेशा असं या तरूणीचं नाव होतं. आयेशाच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर हळहळ व्यक्त करण्यात आली. आता या प्रकरणावर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आपण पुरुष असाल, पण आपल्या पत्नीचा छळ करणं हा मर्दपणा नाही. बायकोला मारहाण करणे म्हणजे पुरुषत्व नाही. बायकोकडे पैसे मागणे हे पुरुषत्व नाही. जर तुम्ही असे कृत्य करत असाल, तर तुम्ही माणूस म्हणवण्याच्या लायकीचे नाहीत, असं ओवैसी म्हणाले. ते एका सभेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी आयेशाच्या मृत्यूवर भाष्य केलं.

अहमदाबादमध्ये एका मुस्लीम तरुणीने आत्महत्या केल्याचा एक वेदनादायक व्हिडिओ आहे. मी आपणा सर्वांना आवाहन करतो, धर्म काहीही असो, हुंड्याचा लोभ संपवा, असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

लक्षात ठेवा, आपण जगाला फसवू शकता आणि अल्लाहला नाही. हे लक्षात असुद्या तुम्ही जगाला धोका देऊ शकता अल्लाह नाही. अल्लाह सगळं पाहतोय, असंही ओवैसींनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

इंदौरच्या अकोलेकरांच्या सुनेवर ‘या’ फोटोमुळे सोशल मीडियातून होतोय कौतुकाचा वर्षाव!

‘संजय राठोड अजुनही मंत्रीपदावरच’; चित्रा वाघ यांचा सरकारवर गंभीर आरोप

“वाटेल तितकं आपटा तुम्ही, वाटेल तितकं बोंबला तुम्हाला उत्तर देणार नाही”

पूजा चव्हाण प्रकरणात नवं वळण; मोबाईल आणि लॅपटाॅप भाजप नेत्यानं चोरला?

मुख्यमंत्र्यांच्या अधिवेशनाच्या भाषणातील राज्यातील 3 महत्वाचे मुद्दे व प्रश्न सांगा आणि बक्षीस मिळवा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More