आरोग्य कोरोना देश

सीरम इन्स्टिट्यूटला मोठा धक्का! ऑक्सफोर्ड लसीच्या भारतातील ह्युमन ट्रायलची मागणी टाळली

लंडन | ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठातील कोरोना लसीनं मानवी चाचणीचे दोन महत्वाचे टप्पे याआधीच पार पाडले आहेत. मात्र या लसीच्या चाचण्या भारतात सुरू करण्याची परवानगी आता तज्ञांच्या समितीनं फेटाळून लावली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला या समितीनं परवानगीसाठी सुधारित प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

एस्ट्राझेनिसा या कंपनीच्या सहाय्यानं ऑक्स्फर्ड विद्यापीठानं कोरोना व्हायरसवरील लस बनवली आहे. मात्र या लसीची किंमत जास्त असल्यानं कमी व मध्यम स्तराचे उत्पन्न असलेल्या देशांसाठी लस तयार करण्यासाठी सीरमनं ब्रिटनच्या कंपनीशी करार केला आहे. मात्र भारतीयांना आतुरता लागून राहिलेल्या या मानवी चाचणीची मागणी कंपनीनं फेटाळल्यानं सीरम इन्स्टिट्यूटसाठी हा मोठा धक्का ठरणार आहे.

सीरमनं पाठवलेल्या प्रस्तावावर तज्ञांनी 8 दुरुस्त्या सुचवल्या आहेत. यामुळे भारतात ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या लसीची मानवी चाचणी लवकर शक्य नसल्याचे संकेतच तज्ञांच्या या निर्णयानं दिले आहेत.

सीरमकडून मात्र या निर्णयावर प्रतिक्रिया द्यायला नकार देण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत असताना ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीची ह्युमन ट्रायल भारतात होणार असल्यानं समाधान व्यक्त केलं जात होतं. मात्र तज्ञांच्या निर्णयानं आता या आनंदावर विरजन पडणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोना नियंत्रणासाठी मुख्यमंत्र्यांकडून लोकप्रतिनिधींना ‘ही’ महत्त्वाची सूचना

पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अजितदादांचा शब्द

पुणे कोरोनामुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा ‘अ‌ॅक्शन प्लॅन’, उपाययोजनांचा घेतला आढावा

उमरग्यात तीन मुलांचा खड्यात साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या