बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भावाच्या लग्नासाठी ठेवलेल्या पैशातून घेतले ऑक्सिजन सिलेंडर, 25 कोरोना रुग्णांना जीवनदान

पुणे | कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. लोकांना उपचारासाठी बेड मिळत नाहीये. अनेकांना बेडसाठी वणवण फिरावं लागतंय. तर अनेकांचा बेड आणि वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती पाहून लोहगावातील तरुणांनी पुढाकार घेत रुग्णांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम सुरू केलं आहे. लोहगाव येथील प्रशांत जगताप या तरुणाने या उपक्रमाला सुरुवात केली आहे.

मागच्या आठवड्यात प्रशांत जगताप यांचा भाऊ सौरभ जगतापचे लग्न होतं. त्याच्या लग्नासाठी 3 लाख 50 हजार खर्च करण्याचा विचार होता. पण सध्याची परिस्थिती पाहून हे पैसे समाजउपयोगी कामासाठी वापरावेत असं त्याने ठरवलं.

3 लाख 50 हजार मध्ये ऑक्सिजनचे 36 सिलेंडर विकत घेतले. नागरिकांना ऑक्सिजन पुरवठा करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत त्यांना 25 रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश आलं आहे, अशी माहिती प्रशांत जगतापने दिली.

दरम्यान, समाजासाठी आपणही काहीतरी देणं लागतो. या उद्देशाने हा उपक्रम चालू केला. आता आमच्याकडे 36 सिलेंडर आहेत. काही संस्थांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. सिलेंडर घेण्यासाठी त्यांनी आर्थिक साहाय्य करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे 36 हा आकडा लवकरच 100 किंवा त्यापेक्षा जास्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं प्रशांत जगतापने यावेळी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

“देशात फक्त तीनच कंपन्यांना परवानगी असताना नागरिकांना ‘ती’ लस कशी दिली जाते”

धक्कादायक! केवळ ओरल सेक्सने 15 वर्षांची मुलगी झाली गर्भवती; घडला ‘हा’ प्रकार

“वकिलाला दररोज अडीच लाख रुपये; राज्य सरकार कोणाचे हित जपत आहे?”

खूशखबर! उद्या केंद्र सरकारतर्फे 19 हजार कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा

‘या’ रक्तगटातील लोकांना कोरोनाचा धोका अधिक; CSIR च्या संशोधनातून खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More