बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठमोळ्या ऑक्सिजन संशोधकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू; डॉ. भालचंद्र काकडे यांचं निधन

चेन्नई | ऑक्सिजनचा उपयोग विविध क्षेत्रात कसा करता येईल याबाबत संशोधन करत असलेल्या मराठमोळ्या तरुण संशोधकाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला. कोल्हापूरच्या डॉ. भालचंद्र काकडे यांचं चेन्नईत निधन झालं. त्यांच्या निधनामुळे प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.

भालचंद्र काकडे हे 44 वर्षांचे होते. भालचंद्र काकडे यांना काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. प्रकृती बिघडल्याने त्यांना चेन्नई इथल्या एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवस त्यांच्यावर तिथे उपचार सुरु होते. त्यांची प्रकृतीही सुधारली होती. व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मंगळवारी रात्री उशिरा अचानक त्या रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा संपला. यामुळे तिथे उपचार घेत असलेल्या दहा जणांचा तडफडून मृत्यू झाला. त्यामध्ये डॉ. काकडे यांचाही समावेश होता.

डॉ. भालचंद्र काकडे यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात रसायनशास्त्र विषयात पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा वापर करुन विविध क्षेत्रात काय करता येईल याचं संशोधन सुरु केलं.

जपानच्या टोकियो इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये देखील ते काही काळ कार्यरत होते. चेन्नईच्या एसआरएम संशोधन संस्थेमध्ये ते वरीष्ठ संशोधक म्हणून रुजू होते. आपल्या संशोधनाच्या जोरावर त्यांनी 7 पेटंट आपल्या नावावर केले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

कोरोना रुग्णांना होतोय ‘म्युकर मायकोसिस’ हा गंभीर आजार; 20 जणांचे डोळे निकामी

पुण्यात भितीचं वातावरण तयार होऊ नये म्हणून मुरलीधर मोहोळ यांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

आम्ही आमच्याकडून भारताला शक्य तेवढी मदत करू- कमला हॅरिस

मी काही उत्कृष्ट काम करत नाही, सामाजिक दायित्व म्हणून मी पुढाकार घेतला – नितीन गडकरी

गायत्री मंत्राने कोरोना पळवणार?; मोदी सरकारचा नवा प्रयोग

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More