OYO Rooms l सध्या OYO रूमची (OYO Rooms) मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. कारण जोडप्यांकडून (Couples) OYO रूमला मोठी मागणी आहे. त्यामुळे देशभरात OYO हॉटेल्स (OYO Hotels) मोठ्या प्रमाणात आहेत. पण आंध्रप्रदेशची (Andhra Pradesh) राजधानी हैदराबादमध्ये (Hyderabad) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांनी या हॉटेलात शिरलेल्या दोन प्रेमीयुगुलांना अटक (Arrest) केली आहे. OYO शी संलग्न (Registered) असलेल्या हॉटेलामधून या जोडप्याला अटक करण्यात आली. हे जोडपे OYO शी संलग्न असलेल्या हॉटेल्समधून रूम बुक करायचे आणि नंतर असे काही कृत्य करायचे की जे पाहून पोलीसही (Police) चक्रावले आहेत.
पकडण्यात आलेल्या या प्रेमीयुगुलामधील तरुण आंध्रप्रदेशातील नेल्लोर (Nellore) जिल्ह्यातील आहे, तर तरुणी मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) आहे. पोलीस या दोघांची कसून चौकशी करत आहेत.
OYO रूममधून गांजा विक्रीचा गोरखधंदा :
हे जोडपे OYO मधून रूम बुक करून तिथे राहायचे आणि रूम भाड्याने घेऊन ते गांजा (Ganja) विकायचे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते गांजा विक्रीचे काम करत होते. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी ऐशोआरामाचे जीवन जगण्यासाठी गांजा विकत असल्याचे सांगितले. वेगवेगळ्या ठिकाणांहून गांजा आणून OYO मधून बुक केलेल्या रूममध्ये राहून गांजाचा पुरवठा (Supply) करत असल्याचे या जोडप्याने सांगितले.
OYO Rooms l ऐशोआरामासाठी आखला प्लॅन :
नेल्लोर जिल्ह्यातील कावला (Kavala) येथील देवेंद्र राजू (Devendula Raju) आणि मध्यप्रदेशातील संजना मांजा (Sanjana Manja) यांची मैत्री झाली होती. नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघेही सोबत राहत होते. प्रचंड पैसा कमवून ऐशोआरामाचे आयुष्य जगण्याचा त्यांचा मानस होता. त्यासाठी त्यांनी एक योजना आखली. त्यानुसार ते नेहमी OYO रूममध्ये राहायचे आणि तिथूनच गांजाचा पुरवठा करायचे. कुणालाही याचा संशय येत नव्हता. आता पोलिसांनी दोघांनाही हैदराबादच्या कोंडापूर (Kondapur) येथील OYO रूममधून अटक केली आहे.
कोंडापूरमधील OYO रूममधून अटक :
“आम्ही एकमेकांना भेटल्यानंतर एकमेकांच्या प्रेमात पडलो. त्यानंतर आम्ही पैसे कमवण्याचा प्लॅन आखला. OYO रूम बुक करायचो, तिथे राहायचो आणि तिथूनच गांजा विक्रीचा धंदा करायचो,” असे या जोडप्याने पोलिसांना सांगितले. कोंडापूरच्या एका OYO रूममध्ये राहून दोघे अनेक दिवसांपासून गांजाची विक्री करत होते. शुक्रवारी रात्री एसटीएफ (STF) टीमने या हॉटेलमध्ये छापा टाकला. तपासणी केली असता त्यांना गांजा सापडला. हे लोक वेगवेगळ्या ठिकाणांहून गांजा आणायचे आणि OYO रूममधून गांजा विकायचे. गांजा विक्रीच्या या व्यवसायात हे दोघेच आहेत का? यांच्या टोळीत (Gang) आणखी कोण कोण आहेत? याचा पोलीस तपास करत आहेत. तसेच त्यांनी आतापर्यंत गांजा विक्रीतून किती पैसा कमावला आहे, याची माहितीही पोलीस घेत आहेत.