…तर भीक मागणे ही सुद्धा एक नोकरीच आहे- पी.चिदंबरम

नवी दिल्ली | भजी विकणे ही नोकरी असेल तर भीक मागणे ही सुद्धा एक नोकरीच आहे, असं काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी म्हटलंय. त्यांनी ट्विटरवर यासंदर्भात ट्विट केलंय. 

नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना तुमच्या ऑफिसच्या बाहेर भजी विकून एकदा दिवसाला 200 रुपये कमवून जात असेल तर तो एकप्रकारचा रोजगारच आहे, असं म्हटलं होतं. नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यावर जोरदार टीका सुरुय. 

दरम्यान, जर भजी विकणे हा रोजगार असेल तर मोदींच्या या तर्कानुसार भीक मागणे ही सुद्धा नोकरी समजली पाहिजे. त्यामुळे गरीब आणि अनाथांनाही नोकरदार समजले पाहिजे,’ अशी टीका चिदंबरम यांनी केली आहे.