माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांच्या घरावर सीबीआयची छापेमारी

चेन्नई | माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्तीच्या चिदंबरम यांच्या चेन्नईतील घरावर सीबीआयने छापा टाकलाय. २००६ मध्ये झालेल्या एअरसेल-मॅक्सिस यांच्या ३ हजार ५०० कोटी रुपयांच्या व्यवहारास परकीय गुंतवणूक वृद्धी मंडळाने मान्यता दिल्याप्रकरणी हा छापा मारण्यात आलाय.

एअरसेल-मॅक्सिसच्या व्यवहारात ६०० कोटी रुपयांपर्यंतच मान्यता देण्यासंबंधी अर्थमंत्र्यांना अधिकार असताना मात्र चिदंबरम यांनी या मर्यादेचं उल्लंघन करून ३,५०० कोटी रुपयांच्या व्यवहारास मान्यता दिल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या