बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…त्याहून निराश म्हणजे UN सभेत मोदींच्या भाषणावर कोणीही टाळी वाजवली नाही”

नवी दिल्ली | संयुक्त राष्ट्रांच्या 76 व्या आमसभेत शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावेळी सभागृहात गर्दी नसल्याने माजीमंत्री काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी मोदींना चिमटा काढला आहे. पी चिदंबरम यांनी ट्विट करुन युएनमधील मोदींच्या भाषणावर भाष्य केलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी युएनच्या सर्वसाधारण सभेत भाषण करत असताना सभागृहात फक्त काहीच सीट भरलेले होते. त्यामुळे, मी निराश झालो आहे, त्याहीपेक्षा निराश कुणीही टाळी न वाजवल्याने झालो, अशी बोचरी टीका पी चिदंबरम यांनी केली आहे.

नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तान आणि चीनला दहशतवादाच्या मुद्द्यावरून कडक शब्दात ठणकावलं. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादासाठी केला जाऊ नये. तुम्ही दहशतवादाचा हत्यार म्हणून वापर केला तर तो तुमच्यासाठीही घातक ठरू शकतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन आणि पाकिस्तानला ठणकावलं.

दरम्यान, भारतासह जगावर आलेलं कोरोनाचं संकट आणि या संकटाचा सामना करण्यासाठी भारताने दिलेलं योगदान यावरही मोदींनी भाष्य केलं. तसेच मोदी यांनी आपल्या तब्बल अर्ध्या तासाच्या भाषणात भारताची संस्कृती, परंपरा आणि मोदी सरकारने गेल्या सात वर्षात केलेल्या कामाची माहिती जगाला दिली.

थोडक्यात बातम्या- 

हृदयस्पर्शी! तहानलेल्या कुत्र्याला त्याने ओंजळीने पाणी पाजलं, पाहा व्हिडीओ

‘लोणीचोरी ही कृष्णलीला असेल तर मिठाईचोरी हा गुन्हा कसा?’; न्यायाधिशांचा निकाल चर्चेत

“चंद्रकांत पाटील यांची वेगळीच तऱ्हाय, एकंदरीत सगळीच गंमतय”

एलआयसीच्या ‘या’ स्कीममध्ये एकदाच पैसे भरा अन् महिन्याला मिळवा ‘इतक्या’ हजारांची पेन्शन

काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यामध्ये तुफान हाणामारी; भाजप खासदाराला कपडे फाटेपर्यंत मारलं, पाहा व्हिडीओुं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More