देश

हे काय पंतप्रधानपद आहे का?; पी चिदंबरम यांनी उडवली शरद पवारांची खिल्ली

नवी दिल्ली | शरद पवार यांच्याकडे यूपीएचं अध्यक्षपद सोपवण्यासंबंधी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे काही पंतप्रधानपद नाही आणि स्वत: शरद पवार यांची युपीए अध्यक्ष म्हणून जाहीर केलं जावं, अशी इच्छा नसावी, असं पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

जेव्हा बैठक होईल तेव्हा योग्य व्यक्तीची निवड केली जाईल. आम्ही पंतप्रधानांची निवड नाही करत आहोत, असं पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

युपीएची बैठक घेण्यासाठी काही पक्ष पुढाकार घेऊ शकतात आणि काँग्रेस त्यात सहभागी होईल. पण जर काँग्रेसने बैठक बोलावली असेल तर काँग्रेसचाच नेता बैठकीचं नेतृत्व करेल, असं पी चिदंबरम यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

सिनेमा पाहण्यासाठी गावकऱ्यांनी केला हा अजब जुगाड!

गाड्यांवर जातिसूचक स्टिकर लावणं महागात पडणार!

“असा तेजस्वी पंतप्रधान भारताला लाभणं, हे आपलं सौभाग्यच”

“मी दबावाखाली मुख्यमंत्री पद स्वीकारलं; कोणालाही मुख्यमंत्री बनवा मला…”

…अन् ऑनलाईन पेपर सोडवून मगच नवरी बोहल्यावर चढली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या