Loading...

पी. चिदंबरम यांची 106 दिवसांनंतर तुरूंगातून सुटका

नवी दिल्ली | आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेले माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची तब्बल 106 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका झाली आहे. ईडीने दाखल केलेल्या गु्न्ह्यात आज 2 लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केल्यानंतर रात्री 8 वाजून 15 मिनिटांनी चिदंबरम अखेर तिहार तुरूंगातून बाहेर पडले आहे.

पी. चिदंबरम तिहार तुरूंगातून बाहेर आले त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि चिदंबरम यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी ‘राहुल गांधी जिंदाबाद’, ‘काँग्रेस जिंदाबाद’, ‘पी. चिदंबरम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देण्यात आल्या.यावेळी त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम देखील तिथे होते.

Loading...

आयएनएक्स मीडिया प्रकरणात अटकेत असलेल्या पी. चिदंबरम यांचा जामीन दिल्ली उच्च न्यायालयाबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. मात्र बुधावारी सकाळी अकरा वाजता सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांच्या जामीन अर्जावर निकाल दिला आहे.

दरम्यान, चिदंबरम यांना 21 ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानावरुन सीबीआयने अटक केली होती. अटक झाल्यापासून पी चिदंबरम जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते.

 

Loading...

महत्वाच्या बातम्या-

 

 

Loading...

 

 

Loading...