बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदी सरकारमध्ये फक्त नितीन गडकरींमध्येच आवाज उठवण्याची हिंमत”

मुंबई | मुंबई, दिल्लीसह देशभरात पेट्रोल-डिझेल महागलं आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचं गडकरींनी एका जाहीर कार्यक्रमात स्वीकार केलं होतं. आता इंधन दरावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

मोदी सरकारमध्ये फक्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरींमध्ये आवाज उठवण्याची हिंमत आहे, असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारमधील सर्व निर्णय हे पंतप्रधान मोदी घेतात हे देशातील प्रत्येक नागरिकाला माहिती आहे. यामुळे कोण अर्थमंत्री आहे आणि कोण नाही, याला काही अर्थ उरत नाही, असं पी. चिदंबरम यांनी म्हटलंय.

पंतप्रधान स्वतः अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री आणि क्रीडामंत्री आहेत. तेच सर्वेसर्वा आहेत. पण केवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींमध्येच हिंमत आहे. ते वेळोवेळी आपला आवाज उठवत असतात. पण सध्या तेही गप्प आहेत. त्यांनी आपला आवज उठवला पाहिजे. त्यांनी कॅबिनेटमध्ये आपला आवाज बुलंद केला पाहिजे, असं पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

जरम्यान, नागपूरमध्ये एलएनजी भरला की ते वाहन 800 किमी चालणार आहे. यामुळे मुंबई, हैदराबाद सारख्या शहरांना जाताना येताना एलएनजी पंप उभारावे लागणार आहेत. असे केल्यास वाहतूकीचा खर्च कमी होणार असून डिझेलवरील सरकारचे तसेत वाहन मालकाचे पैसे वाचणार आहेत, असे गडकरी म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

“भारतातल्या नागरिकांना विनामास्क फिरताना बघायचंय”

“चंद्कांत पाटील म्हणजे निरागसतेचं लेणं, एक निष्पाप बालक”

अनिल देशमुख यांच्यानंतर आता सुपुत्र ‘सलिल देशमुख’ ईडीच्या रडारवर?

“लक्षात ठेवा, आम्हाला डिवचल्यास बारा वाजवल्याशिवाय राहणार नाही”

पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेविका अर्चना बारणेंचं निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More