बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार लॉक डाऊन का करत नाही?- पी. चिदंबरम

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाने सरकारसोबतच विरोधी पक्षही चिंतेत आहे. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही सरकार लॉक डाऊन का करत नाही, असा सवाल केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे. यांसंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

दोन रुग्णांना कोरोनाचे संक्रमण झाल्याचे गुरुवारी सकाळी निष्पन्न झाल्याने देशभरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 170 वर गेली आहे. ही गंभीर परिस्थिती आहे, असं पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या महानिर्देशकांनी कोरोनाबाबत बुधवारी जारी केलेल्या पत्रकानंतर सरकराने देशातील सर्व गावे आणि शहरे दोन ते चार आठवड्यांसाठी लॉक डाऊन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 170 वर गेली आहे. त्यात तीनजणांचा मृत्यू झाला असून 16 जण बरे झाले आहेत. महाराष्ट्रातही रुग्णांचा आकडा वाढला असून ती संख्या 49 वर गेली आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

पेट्रोल 30 रुपये लिटर द्या, कॉंग्रेसची मागणी

“संपूर्ण सरकारी यंत्रणा जीवाची पर्वा न करता कोरोनाशी मुकाबला करतीय याचं मला समाधान आहे”

महत्वाच्या बातम्या-

शिवरायांचा महाराष्ट्र किती लढवय्या आहे हे आपण साऱ्या जगाला दाखवून देऊ- मुख्यमंत्री

पंतप्रधानांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी जी काही गरज पडेल ती पुरविण्याचं वचन दिलंय- उद्धव ठाकरे

आपण जागतिक यु्द्ध लढत आहेत, घाबरून युद्ध जिकंलं जात नाही- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More