बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पीव्ही सिंधूने रचला इतिहास; भारतासाठी जिंकलं गोल्ड मेडल

नवी दिल्ली | भारताची अव्वल बॅडमिंडटन खेळाडू पीव्ही सिंधूने(PV Sindhu) पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आहे. काही दिवसांपासून इंग्लडमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू होती. या सामन्यात पहिला गेम सिंधूने 21-15 असा जिंकला होता, तर दुसऱ्या गेममध्ये दमदार कामगिरी करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

सिंधूचा हा सामना कॅनडाच्या मिचेलसोबत झाला. खेळताना मिचलने काही पाॅंईट्स कमवत सिंधूच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला होता. तरीही सिंधूने 6-7 अशी आघाडी ठेवली होती. त्यानंतर सिंधूने आक्रमक खेळ खेळला होता. सिंधूने ही आघाडी 19-15 अशी वाढवली आणि पहिला गेम जिंकला होता.

सिंधूचा हा सामना कॅनडाच्या मिचेल लीबबरोवर होणार होता. यापूर्वी सिंधूने सिंगापूर आणि मलेशियाच्या खेळाडूंना पराभूत केले होते. सध्याच्या घडीला सिंधू चांगल्या फार्मात आहे. कारण यापूर्वी सिंधूने सिंगापूर खुली स्पर्धा जिंकली होती. त्याचबरोबर राष्ट्रकुल स्पर्धेत ध्वजवाहक होण्याचा दुसऱ्यांदा मानही सिंधूला मिळाला होता.

दरम्यान, यापूर्वी सिंधूने 2014 साली राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते, तर 2018 साली रौप्य पदाची कमाई केली होती. त्यामुळे तीचे राष्ट्रकुलमधील हे पहिले सुवर्ण पदक आहे. सायना नेहवालने 2010 व 2018 मध्ये महिला एकेरीचे सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर महिला एकेरीत सुवर्णपदक जिंकणारी सिंधू ही दुसरी भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली. सिंधूच्या या विजयाने भारताच्या सुवर्णपदकांची संख्या 19 झाली आहे.

थोडक्यात बातम्या-

“तुम्ही स्वाभिमानी असाल तर, महाराष्ट्र मुघलांच्या तावडीतून सोडवा”

मोठी बातमी! संजय राऊतांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या मुलींची नावं, प्रमाणपत्र रद्द

मोठी बातमी! बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप होणार?

पुणेरी पाटी पाहताच अमृता फडणवीसांना आठवले एकनाथ शिंदे, म्हणाल्या…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More