बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“फडणवीसांनी टाकलेल्या आमदारकीच्या तुकड्यासाठी पडळकर बेताल वक्तव्य करतात”

मुंबई | भाजप नेेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या आरोपानंतर राज्यातलं राजकारण तापलेलं दिसत आहे. भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या जगन्नाथ काकडे पाटील यांनी गोपीचंड पडळकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

फडणवीसांनी टाकलेल्या आमदारकीच्या तुकड्यासाठी पडळकर बेताल वक्तव्य करतात अशी टीका जगन्नाथ काकडे यांनी केली आहे. गोपीचंद पडळकर यांचा राजकीय उदय होत असताना भाजपच्या वळचणीवर असलेल्या महादेव जाणकरांची भाजपने फरफट केली, असं जगन्नाथ काकडे यांनी म्हटलं आहे. आपल्या हातात राहिल असा नेता फडणवीसांनी हेरलं आणि बारामतीत उभं केलं, असंही काकडे म्हणाले आहेत.

पडळकर हारले आणि फडणवीसांचा डाव साधला गेला. महाराष्ट्रात सत्ता काबीज करण्यासाठी माधव समिकरण आरएसएसने तयार केलं होतं. पडळकरांनी फडणवीसांच्या पदरी बांधून स्वत:ला गुलाम बनवून घेतलं आहे. त्यामुळे पडळकर यांनी मालकाच्या इशाऱ्यावर गुरगुरत असतात, असंही जगन्नाथ काकडे पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, पवारांवर टीका केली म्हणजे आपली राजकीय उंची वाढते, असं राज्यातील अनेक नेत्यांना वाटतं. तर मोदी सरकारने धनगरांची फसवणूक केली असल्याचं देखील जगन्नाथ काकडे यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“किरीट सोमय्यांचं नाट्य म्हणजे मराठी रंगभूमीचा अपमान”

‘ब्युरोक्रेसी काहीच नाही, ते आमच्या चपला उचलतात’; उमा भारती यांचं वादग्रस्त वक्तव्य

किरीट सोमय्या ईडीचे प्रमुख आहेत का?- सुप्रिया सुळे

“…तर आज महात्मा गांधी यांच्यापेक्षा राखी सावंत महान ठरली असती”

मनोहर मामाच्या अडचणी वाढल्या, न्यायालयाकडून 7 दिवसांची पोलीस कोठडी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More