बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘वसुली सरकार भरती काढत नाही आणि काढली तर सावळा गोंधळ घालतं’; पडळकरांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

मुंबई | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर सरकारी भरतीच्या परीक्षेच्या मुद्द्यावरून निशाणा साधला आहे. आरोग्य विभागाने काही दिवसांपूर्वी ऐनवेळी आपली परीक्षा रद्द केली होती. त्यानंतर आता विद्यार्थ्यांच्या परीक्षा केंद्राचा गोंधळ अजूनही संपलेला दिसत नाही. विद्यार्थ्यांना दोन वेगवेगळ्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्र मिळाल्याने एकाच दिवशी दोन जिल्ह्यात परीक्षा द्यायला कसं जाणार? हा प्रश्न उपस्थित झाला होता.

गोपीचंद पडळकर यांनी या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकारला सरकारी भरतीच्या परीक्षांमध्ये गोंधळ घालण्याची सवय लागली आहे, असं म्हणत प्रशासन आणि सरकारमध्ये कोणताच ताळमेळ नसल्याची टीका केली आहे. दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र देऊन विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा अधिकार नाकारत असल्याचा आरोप करत की वसुली सरकार नोकर भरती काढत नाही आणि काढली तर असा गोंधळ घालतं, अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.

आरोग्य विभागाच्या परीक्षेवरून महाविकास आघाडी सरकार यापूर्वी चांगलंच अडचणीत सापडलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा परीक्षेतील गोंधळ समोर आल्याने सरकारवर टीकेची झोड उठल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच यामधून सरकार आता नेमका कसा मार्ग काढणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

“महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा राज्य सरकारने सहा वेळा पुढे ढकलली होती, विद्यार्थ्यांच्या तणावाचं कोणत्याही प्रकारचं गांभीर्य सरकारला नाही”, असं म्हणत पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर चौफेर फटकेबाजी केली आहे.

थोडक्यात बातम्या –

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी मिरवणूक काढल्याने माजी मंत्र्यांवर गुन्हा दाखल

‘त्या’ लेडी डॉनचा तुमच्याशी संबंध काय?, नवाब मलिकांनी पुन्हा समीर वानखेडेंना घेरलं

गॅस कटरने एटीएम कापून चोरट्यांनी पळवळी लाखोंची रक्कम

“यंत्रणांचा गैरवापर केला असता तर तुमचं अर्थ मंत्रिमंडळ तुरुंगात असतं”

आता गॅस सिलेंडरच्या बुकिंगमध्ये वाचवा पैसे, कसं ते वाचा सविस्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More