बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शासन आदेशात एक नाही तर अनेक गोष्टींचा घोळ’; पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई | विद्यार्थी आधीच अडचणीत आणि निराशेत आहे. त्यात सरकार खोटे दिलासे आणि आश्वासने देऊन विद्यार्थ्यांची फसवणूक करतंय.  SEBC च्या उमेदवारांना दिलासा देणारा शासन निर्णय संपूर्णपणे फसवा असल्याचा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. त्यांनी या संदर्भात  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे.

शासन आदेशात एक नाही तर अनेक गोष्टींचा घोळ आहे. प्रस्थापितांना भरती प्रक्रियेत जाणीवपूर्वक गोंधळाची स्थिती निर्माण करायची आहे. यामुळेच ही संपूर्ण प्रक्रिया पुन्हा एकदा न्यायलयाच्या कचाट्यात सापडेल आणि महाविकास आघाडीच्या कृतीशुन्यतेला असह्यातेचं नाव देत सरकारला पळवाट मिळेल, असं पडळकरांनी म्हटलंय.

अशानं हे सरकार अनेकांना स्वप्निल लोणकर सारख्या दुर्देवी मार्गावर लोट आहे. राज्यात असे हजारो स्पप्निल आहेत, ज्यांना धीर देण्याची गरज आहे. पण धीर देण्याऐवजी सरकार अनेकांना स्वप्निल लोणकर सारख्या दुर्देवी मार्गावर लोटत आहे, असं पडळकर म्हणाले.

निराशाजनक वातावरणात असणाऱ्या विद्यार्थ्यांना खोटा दिलासा देऊन त्यांची फसवणूक केली जातेय, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

मराठमोळ्या संजलने अमेरिकेत खासगी अंतराळ यान बनवणाऱ्या टीममध्ये पटकावलं स्थान!

‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; घराच्या बाहेर पडत असाल तर सावधान

“शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणी करून आपले देव, धर्म बासणात गुंडाळलेत”

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; विविध विषयांवर अर्धा तास चर्चा

“…तर अशा लोकांवर गंगामाईचा कोप झाल्याशिवाय राहणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More