बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पडळकर यांच्या जीवाला धोका, विशेष पोलिस संरक्षण मिळाले पाहिजे”

मुंबई | एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुरूवातीपासूनच पाठींबा दिला आहे. आताही ते मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना विशेष पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. गोपीचंद पडळकर हे राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आंदोलन करत असल्याने गोपीचंद पडळकर यांच्या जीवाला धोका आहे, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. बहुजनांच्या बाजूने उभे राहिल्याने दुखावलेले लोक त्यांच्यावर सातत्याने हल्ला करत आहेत, असाही उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे.

पुढे त्यांनी म्हटलं आहे, लोकशाहीत विरोधकांचा आवाज दाबणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. विरोधक असो वा सत्ताधारी ज्याच्या जीवास धोका असेल, त्याला संरक्षण मिळाले पाहिजे, असं म्हणत फडणवीसांनी पत्रातून पडळकरांना विशेष पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. फडणवीसांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलिस महासंचालक संजय पांडे यांनाही मागणीचं पत्र पाठवलं आहे

गोपीचंद पडळकर सातत्याने राज्य सरकारवर टीका करताना दिसून येतात. एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठीही ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी पडळकर आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला होता. याच पार्श्वभूमीवर फडणवीसांनी सदर मागणी केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

परमबीर सिंगांच्या अडचणी वाढल्या; न्यायालयाने केली ‘ही’ मोठी कारवाई

शरद पवारांकडून अनिल देशमुखांची पाठराखन, विरोधकांवर निशाणा साधत म्हणाले…

‘तिची लायकी नाही की…’, विजय वडेट्टीवारांनी भडकून केलं स्फोटक विधान

“मंत्री झगमगाटात पण विद्येचं माहेरघर अंधारात”

अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात गुन्हा दाखल; पत्नीने केले ‘हे’ गंभीर आरोप

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More