‘संभाजी महाराजांना जे धर्मवीर मानत नाहीत त्यांची…’; पडळकरांची जीभ घसरली

पुणे | राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविषयी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर (Mla Gopichand Padalkar) यांची जीभ घसरली आहे. ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.

संभाजी महाराजांना जे धर्मवीर मानत नाही, त्यांची सुंता झाली असेल, जाऊन पाहा, असं वक्तव्य गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केलं आहे.

संभाजी महाराज धर्मवीर नसते जे कोणी असे म्हणत आहेत असे म्हणणाऱ्यांची कदाचित ‘सुंता’ झाली असती. त्यांना जर तसे वाटत असेल तर प्रसारमाध्यमांच्या मित्रांना माझी विनंती आहे की, त्यांनी तिथे जाऊन खरी परिस्थिती काय आहे? हे तपासावं, असं पडळकर म्हणालेत.

संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक यावरुन अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं होतं. गल्लीपासून दिल्लीपर्यंत अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत होती.

काही दिवसांनंतर नवीन वादाला तोंड फुटताच अजित पवार यांचं वक्तव्य विरोधकांच्या विस्मरणात गेले. मात्र गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा शमलेल्या वादात ठिणगी टाकली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-