बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदींचे अनुमोदक छन्नूलाल मिश्रांचा भाजपला विसर, घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

वारणसी | उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असल्यामुळं राज्यातील आरोग्ययंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. ऑक्सिजन, औषधी आणि उपचारांअभावी अनेक मृत्यू होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. ही वेळ फक्त सामान्य लोकांवरच नव्हे तर पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी असलेले पं. छन्नूलाल मिश्रा यांच्यावरही ओढावली आहे.

पं. छन्नूलाल मिश्रा यांच्या मुलीचा नुकताच एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. यानंतर छन्नुलाल मिश्रा यांच्या कुटुंबीयांनी संबंधित रुग्णालयावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे. काही दिवसांपूर्वीच पं. छन्नूलाल मिश्रा यांच्या पत्नीचं कोरोनामुळं निधन झालं होतं. त्यानंतर गेल्या आठवड्यात त्यांची मोठी मुलगी संगीता मिश्रा हिलादेखील कोरोनामुळं प्राण गमवावे लागले. त्यानंतर पं. छन्नूलाल मिश्रा यांची दुसरी मुलगी नम्रता हिनं रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

रुग्णालयानं आमच्याकडून केवळ पैसे उकळले. त्यानंतर अचानक माझ्या बहिणीचा मृत्यू झाला असं सांगण्यात आलं. आम्ही तिच्यावर उपचार सुरु असतानाचे सीसीटीव्ही फुटेज मागितले तर ते देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे माझ्या बहिणीची हत्या झाली आहे, असा आरोप नम्रता यांनी केला आहे.

2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले तेव्हा पं. छन्नूलाल मिश्रा यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली होती. मात्र, आता याच पं. छन्नूलाल मिश्रांचा भाजपला पुरता विसर पडलेला दिसत आहे.
नम्रता यांच्या माहितीनुसार, त्यांच्या बहिणीला उलटी आणि ताप येत असल्यामुळे 24 एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

दरम्यान, काही दिवसांच्या उपचारानंतर मिश्रा कुटुंबीयांना दीड लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर अचानक संगीता मिश्रा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. नंतरच्या काळात संगीता मिश्रा यांच्यावर उपचार सुरु असल्याचं सांगण्यात आलं. त्यांना सात्विक भोजन आणि काढा दिला जात असल्याचं रुग्णालय प्रशासनानं सांगितलं.

मात्र, 1 मे रोजी अचानक त्यांचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं. मृत्यूचं कारण विचारलं असता प्रत्येक डॉक्टरांकडून वेगवेगळी माहिती देण्यात आली. त्यामुळे मिश्रा कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला होता. या प्रकारामुळे आता एकच खळबळ उडाली आहे.

थोडक्यात बातम्या

“लोकशाही संपली असं जाहीर करा नाहीतर चंद्रकांत पाटील यांनी न्यायालयाची माफी मागावी”

कोरोनाचे उपचार घेताना ‘हे’ औषध घेतलं तर झपाट्याने पसरेल कोरोना; एम्स संचालकांचा इशारा

…म्हणून कंगणा राणावतला कोसळलं रडू, पाहा व्हिडीओ

आनंदाची बातमी! भारतातील ‘ही’ लस कोरोनावर प्रभावी; ICMR च्या संशोधनातून समोर आले निष्कर्ष

पत्नी आणि मुलीसाठी सुट्टी मिळाली नाही; पोलिस अधिकाऱ्याचा बेधडक निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More