Top News महाराष्ट्र मुंबई

‘माझ्यासाठी हा पुरस्कार म्हणजे…’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सिंधुताई सपकाळांची प्रतिक्रिया

मुंबई | प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सात जणांना पद्मविभूषण, 10 जणांना पद्मभूषण, तर 102 जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाले आहेत. यामध्ये अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांना भारत सरकारचा ‘पद्मश्री’ जाहीर केला आहे. यावर सिंधुताईंनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

कधी कल्पनादेखील केली नव्हती की पद्मश्रीसारखा पुरस्कार मला मिळेल. हे कसं शक्य झालं हे मला माहिती नाही. कारण मी चौथी पास बाई. त्यामुळे हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी एक धक्काच असल्याचं सिंधूताई सपकाळ म्हणाल्या.

अनाथ मुले, महिलांचे अनेक प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न केला. हे सारे लोक मग माझ्यासोबत राहू लागले. त्यांना पुढे घेऊन जाण्याचं काम, आजपर्यंत मी केलं आहे. आजवरच्या प्रवासात समाजातील सर्वांनी सढळ हाताने मदत केली. त्या सर्वांना मी हा पुरस्कार अर्पण करते.

दरम्यान, रेल्वेत भीक मागणारी बाई ते अनाथांची माय हा अंगावर काटा आणणारा प्रवास सिंधुताईंनी आपल्या शब्दात लोकसत्ताशी बोलताना मांडला.

थोडक्यात बातम्या-

राजस्थानात सर्वांत मोठी छापेमारी; ‘इतक्या’ कोटींचा काळा पैसा जप्त

अमृता फडणवीसांचा ठाकरे कुटुंबावर गंभीर आरोप, म्हणाल्या…

अभिनंदन!!! महाराष्ट्रातील तिघांना जीवन रक्षा पदक पुरस्कार जाहीर

घेतलं बरं का मिटवून…. त्या चिमुकल्यांच्या भांडणाचा अखेर गोड शेवट, पाहा व्हिडीओ-

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार घोषित

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या