बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इंदोरीकर महाराजांना धारेवर धरू नये- पद्मश्री पोपटराव पवार

अहमदनगर | गेले आठवडाभर प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकराजांचं वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्रभर गाजलं. महाराजांच्या वक्तव्याचा काही पुरोगामी संघटनांनी विरोध केला. तर अनेक राजकीय नेत्यांनी महाराजांंना जाहीरपणे पाठींबा दर्शवला. अशातच पद्मश्री पुरस्कार विजेते पोपटराव पवार यांनीही महाराजांना आपला पाठींबा दर्शवला आहे.

वारकरी संप्रदायाचे पाईक असलेल्या इंदोरीकर महाराजांनी तरूण पिढीला दिशा देण्याचं काम सातत्यानं केलं आहे. त्यामुळं एखादा शब्द चुकला म्हणून त्यांना धारेवर धरता कामा नये, असं पोपटराव पवार यांनी म्हटलं आहे. ते एका पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.

लोकांना चांगल्या सवयी लागल्या पाहिजेत. विशेषतः तरूण पिढी सुधारली पाहिजे. पूर्वी विश्वासाचे वातावरण होते. रात्री-अपरात्री मुली सुरक्षित होत्या. आता दिवसासुद्धा आई-वडिलांना चिंता वाटते. त्यामुळे इंदोरीकर महाराज कीर्तनाद्वारे समाजप्रबोधन करत आहेत ते चांगलं करत, असंही पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आज अकोला तालुक्यातील लोक इंदुरीकरांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून त्यांनी कडकडीत बंद पाळला होता.

ट्रेंडिंग बातम्या-

“ठाकरे सरकार पोकळ आणि बहिरं असून या सरकारला मराठा समाजाप्रती आस्था नाही”

लेकीच्या बुरखा घालण्यावरून टीका करणाऱ्यांना ए. आर. रेहमानचं जोरदार उत्तर

महत्वाच्या बातम्या-

कर्जमाफाची पहिली यादी उद्या जाहीर करणार- मुख्यमंत्री

सरकार काम करतंय हे विरोधकांना पचत नाही- उद्धव ठाकरे

“पवारांवर पीएचडी करण्यासाठी मी विद्यार्थी म्हणून 10-12 वर्ष अभ्यास करण्यास तयार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More