नवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सात जणांना पद्मविभूषण, 10 जणांना पद्मभूषण, तर 102 जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाले आहेत.
अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांना भारत सरकारचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
सिंधुताईनां लोक प्रेमाने माई म्हणतात. वर्धा जिल्ह्यातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी आहे. अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाचे परशुराम गंगावणे यांना कला क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
थोडक्यात बातम्या-
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलीस अॅक्शनमध्ये; ‘या’ चॅनेलवर केली मोठी कारवाई
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून महाराष्ट्राच्या 57 शूर पोलिसांना पदक जाहीर
टाटांची बहुचर्चित सफारी 26 जानेवारीला लाँच होणार; जाणून घ्या वैशिष्ट्यं
पोटच्या मुलींची हत्या केली; म्हणाले, सकाळी पुन्हा जिवंत होणार!
न्यायालयाच्या ‘त्या’ निर्णयावर रितेश देशमुखची उघड उघड नाराजी; म्हणाला…