अजूनही फेसबुकवर दिसतोय लिक्ड झालेला ‘पद्मावत’!

मुंबई | पद्मावत सिनेमाला लागलेलं पायरसीचं ग्रहण काही सुटण्याचं नाव घेत नाहीय. कारण ‘जाटों का अड्डा’ फेसबुक पेजनंतर आणखी एका व्यक्तीनं ‘पद्मावत’ आपल्या फेसबुकवर टाकलाय. गौर शंकर असं या व्यक्तीचं नाव आहे.

‘जाटों का अड्डा’ फेसबुक पेजनं थिएटरमधून थेट फेसबुक लाईव्ह केलं होतं. जे एकावेळी 18 हजारपेक्षा जास्त लोक पाहात होते. फेसबुकनं नंतर हा व्हिडिओ हटवला मात्र तोपर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला होता.

आता गौर शंकर नावाच्या व्यक्तीनं आपल्या फेसबुकवर हा सिनेमा टाकलाय. आतापर्यंत 28 हजार लोकांनी ही पोस्ट शेअर केली असून 5 लाख लोकांनी हा सिनेमा पाहिलाय.

गौर शंकरची फेसबुक पोस्ट-