‘पद्मावत’वर पाकिस्तानमध्येही बंदी? कारण हैराण करणारं!!!

इस्लामाबाद | दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या पद्मावत सिनेमामागे सुरु असलेली साडेसाती काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. आता पाकिस्तानमध्ये या सिनेमावरुन वाद निर्माण झालाय. 

भारतात पद्मावतीच्या पात्रावर आक्षेप होता, तर पाकिस्तानमध्ये चक्क खिलजीच्या पात्रावर आक्षेप घेण्यात आलाय. या सिनेमात मुस्लिमांचं चित्रण चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप होतोय. 

दरम्यान, पाकिस्तानच्या पंजाब सेन्सॉर बोर्डाने आता याप्रकरणी सर्व सदस्यांची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये सिनेमा पुन्हा सेन्सॉर करण्यात येणार असून बंदी घालण्याची शक्यता देखील व्यक्त केली जातेय.