पद्मावतीला आणखी एक धक्का, आता गुजरातमध्येही बंदी!

पद्मावतीला आणखी एक धक्का, आता गुजरातमध्येही बंदी!

अहमदाबाद | वाद सुटत नाही तोपर्यंत गुजरातमध्ये पद्मावती सिनेमावर बंदी घालण्यात येत आहे, अशी घोषणा गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी केलीय. यामुळे पद्मावतीच्या टीमला आणखी एक धक्का बसलाय. 

राणी पद्मावतीचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप करत राजपूत समाज या सिनेमाविरुद्ध उभा ठाकलाय. दिग्दर्शक संजय लिला भन्साळी, दीपिका पादुकोन आणि रणबीर सिंग यांना यापूर्वी धमक्याही मिळाल्या आहेत. 

दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह यांनी यापूर्वीच पद्मावतीवर बंदी घातलीय. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी पद्मावतीवर बंदी घालावी, अशी मागणी केंद्राकडे केलीय. 

Google+ Linkedin