पद्मावती दाखवाल तर याद राखा, थिएटर तोडून टाकू!

नवी दिल्ली | पद्मावती सिनेमा काटछाट करुन दाखवण्यास सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिल्याचं कळतंय. मात्र तरीही या सिनेमाच्या मागे लागलेली साडेसाती काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. 

सिनेमाच्या प्रदर्शनाला करणी सेनेनं विरोध केलाय. सिनेमा दाखवाल तर थिएटर्स तोडून टाकू, अशी धमकी करणी सेनेनं दिलीय. 

पद्मावतीबाबत काय निर्णय झाला तो अद्याप आम्हाला कळालेला नाही, मात्र आम्ही आमच्या जुन्या मार्गावरच कायम आहोत, आमचा सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध आहे, असं करणी सेनेचे संयोजक लोकेंद्र कालवी यांनी म्हटलंय.