Pain from drumming | गणेशोत्सवात आता काहीच दिवस शिल्लक आहेत. महाराष्ट्रात सध्या अनेक ठिकाणी ढोल पथकाचा सराव सुरू झाला आहे. बाप्पाची मिरवणूक आणि ढोल-ताशा वादन हे जणू समीकरणच बनले आहे. वर्षानूवर्षे ही परंपरा चालत आली आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात देखील ढोल वादन केले जाते. मात्र, याच ढोल वादनमुळे वादकांवर गंभीर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. (Pain from drumming )
ढोल-ताशा पथकातील मुलांमध्ये या वादनावेळी एक वेगळाच उत्साह असतो. मात्र, यामुळे त्यांना अनेक शारीरिक इजा देखील होतात. ढोल-ताशा वादकांसाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
ढोल-ताशा वादनाने होऊ शकतात गंभीर इजा
ढोल ताशा पथकामधील मुले ढोल हा आपल्या पोटाच्या खालच्या बाजूला बांधत असतात. यामुळे ढोल वाजवताना सातत्याने तेथे घर्षण होऊन जननेंद्रियांना इजा होते. यामुळे लघवीतून रक्त येण्याच्या समस्या सुरू होतात. त्याचबरोबर पोटदुखीच्या तक्रारी देखील यामुळे वाढू शकतात.(Pain from drumming )
या ढोल ताशा पथकामध्ये मुलींचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. मुली पारंपारिक पद्धतीचा पोशाख करून मोठ्या उत्साहाने ढोल पथकात सहभागी होतात. मात्र, ढोल ताशा पथकात दीर्घकाळ वादन केल्यामुळे मुलींना पाठदुखी आणि हात दुखणे अशा समस्या जाणवू शकतात. तसेच बहिरेपणा देखील येऊ शकतो.
सतत वादन केल्यामुळे आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. शरीरावर ताण आल्यास त्याचे गंभीर दुष्परिणाम देखील होऊ शकतात. त्यामुळे ढोल-ताशा पथकातील मुलींच्या आरोग्यावर होणारा परिणाम तपासण्यासाठी अभ्यास होण्याची आवश्यकता असल्याचे तज्ञांनी म्हटले(Pain from drumming )
दुसरीकडे काही वादक याबाबत म्हणतात की, ढोल वादनाची एक पद्धत असते. ती पद्धत जर सजमली आणि त्याप्रमाणे ढोल वादन केले तर त्रास कमी होतो. त्याचबरोबर ढोल वादनसाठी शारीरिक क्षमता देखील परिणाम करत असल्याचे काही वादकांनी म्हटले.(Pain from drumming )
News Title : Pain from drumming
महत्वाच्या बातम्या-
लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार, साताऱ्यातील घटनेनं मोठी खळबळ
‘या’ राशींवर होईल सुखाचा वर्षाव, नवीन कार्य करण्यास शुभ दिवस
क्रिकेटप्रेमींनो ‘या’ दिवशी रंगणार WTC 2025 फायनल! ICCकडून तारीख जाहीर
पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला गेले तडे!
पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! ‘या’ तीन मेट्रो स्थानकांची नावे बदलणार