बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘4 दिवसाच्या वाळक्या भाकऱ्या खातोय साहेब’; पाहा एसटी कर्मचाऱ्याची दयनीय अवस्था

उस्मानाबाद | दिवाळीच्या तोंडावर प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. अशातच 2 दिवसांपूर्वीच शेवगाव येथे एका एसटी चालकाने बस डेपोवरच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. अशा सर्व परिस्थितीत आता एसटी कर्मचाऱ्यांची दयनीय अवस्था दर्शविणारा एक व्हिडीओ समोर आला आहे.

उमरगा डेपो येथील एका एसटी कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये या एसटी कर्मचाऱ्यावर आर्थिक संकटामुळे आलेली परिस्थिती काळीज पिळवटून टाकणारी आहे. व्हिडीओमधील कर्मचारी दोन-तीन दिवसाच्या शिळ्या वाळलेल्या भाकरी आणि चटणी खाताना दिसत आहे. पगार कमी असल्यामुळे भाज्या घ्यायला पैसे नाहीत. त्यामुळे चटणी मिरचीच खावी लागत असल्याची व्यथा या कर्मचाऱ्याने व्यक्त केली आहे.

कर्जाच्या ओझ्याखाली बुडाल्याने मागील काही दिवसांत अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यातील अनेक कर्मचाऱ्यांनी तर बस डेपोवरच एसटी बसमध्ये आत्महत्या केल्या आहेत. पगार वेळेवर मिळत नसल्याने अनेक कर्मचारी आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता या शेतकऱ्याचा डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ समोर आला आहे.

कोरोनाकाळात मृत्यु झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना काहीच आर्थिक मदत मिळाली नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. यासोबत अजूनही इतर मागण्या या एसटी कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. अशा सर्व परिस्थितीत या कर्मचाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओतून सध्या एसटी कर्मचाऱ्यांवर आलेल्या दयनीय परिस्थितीचा अंदाज येत आहे.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

आता ‘या’ प्रवाशांना मिळणार लोकल प्रवासाची मुभा; राज्य सरकारची मागणी झाली मान्य

‘त्याच्या उत्पन्नातून एसटी महामंडळ चालु शकते एवढं त्याने कमावलंय’, राणेंचा पुन्हा एकदा वार

“शंभरपेक्षा जास्त लोकांना अडकवलंय, आता त्यांचा पर्दाफाश मी करणार”

रजनीकांत पुढचे काही दिवस रूग्णालयातच; तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती आली समोर

…तर या कायद्याप्रमाणे वानखेडेंची चौकशी होणार, धनंजय मुंडेंचं मोठं विधान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More