Top News देश

‘हो…दाऊद इब्राहिम आमच्याच देशात’; अखेर पाकिस्तानने दिली कबूली

इस्लामाबाद | कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम पाकिस्तान असल्याचं पाकिस्तानने कबूल केलं आहे. दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील कराचीमध्ये आहे. या गोष्टीला पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दुजोरा दिला आहे. गेले अनेक वर्ष पाकिस्तानकडून दाऊद तिथे असल्याची बाब नाकारण्यात येत होती.

पाकिस्तान दहशतवादी पोसत असल्याचं समोर येऊ लागल्याने आता पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एफएटीएफ या संस्थेच्या कारवाईची टांगती तलवार सध्या पाकिस्तानवर आहे. त्यामुळे एफएटीएफचे निर्बंध टाळण्यासाठी आता पाकिस्तानने प्रयत्न सुरु केले आहेत.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या वतीने जगभरातील 88 दहशतवादी संघटनांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये दाऊद इब्राहिम तसंच त्याच्या साथिदारांची नावं आहेत. या दहशतवाद्यांवर कारवाईचा बडगा उगारत कठोर निर्बंध लादले आहेत.

मुंबईत 1993 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी असलेला दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्येच लपून असल्याची पहिल्यांदा पाकने कबूली दिलीये. मुंबईतील या दहशतवादी हल्ल्यात जवळपास साडे तीनशे लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर भारत सरकारने 2003 साली अमेरिकेसोबत येत दाऊदला जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत टाकलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

“गणपती बाप्पांच्या कृपेने महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल”

भारताचा चीनला आणखी एक झटका; मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पीपीई किट घालून एकनाथ शिंदे यांनी घेतली कोरोनाबाधित शिवसैनिकांची भेट!

“मोदी खोटं बोलत नाही असा एकही दिवस नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या