चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पाकिस्तानी खेळाडू रातोरात मालामाल

इस्लामाबाद | चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू एका रात्रीत मालामाल झाले आहेत. रोख रकमेसह या खेळाडूंचा चक्क जमिनी बक्षिस देण्यात आल्या आहेत.

पाकिस्तानी संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता म्हणून २० कोटी रुपये मिळाले आहेत.  पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी प्रत्येक खेळाडूला १ कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केलीय.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डीकडून २ कोटी ९० लाख रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आलाय. याशिवाय प्रत्येक खेळाडूला १० लाख रुपये मिळणार आहेत.

तसंच बिल्डर रियाज मलिक यांनी प्रत्येक खेळाडूला १० लाख रुपयांसह प्लॉट देण्याची घोषणा केलीय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या