भारताच्या विजयामुळे पाकिस्तान टी-20 क्रमवारीत नंबर वन!

मुंबई | भारताने न्यूझीलंडचा पराभव करत टी-20 मालिका खिशात घातली. मात्र हा विजय पाकिस्तानच्या पथ्यावर पडला असून टी-20 क्रमवारीत ते पहिल्या क्रमांकावर विराजमान झाले आहेत. 

पाकिस्तानचे सध्या 124 गुण आहेत. भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी न्यूझीलंडचे 125 गुण होते. मात्र मालिकेनंतर त्याचे 120 झाले आहेत. त्यामुळे त्यांना पहिलं स्थान गमवावं लागलंय. 

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर भारताचे 119 गुण झाले असून भारत पाचव्या स्थानी कायम आहे. दुसरीकडे भारताचा कर्णधार विराट कोहली पहिल्या स्थानावर विराजमान आहे.