pakistan 1 760 1495111633 749x421 - मुस्लीम देश असल्याने खटला आपल्याविरोधात, पाकचा अजब दावा
- विदेश

मुस्लीम देश असल्याने खटला आपल्याविरोधात, पाकचा अजब दावा

नवी दिल्ली | कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर पाकिस्तानमध्ये अजब प्रतिक्रिया उमटत आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांवर आपण मुस्लीम राष्ट्र असल्यानेच आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आपल्याविरोधात निकाल दिला, असा सूर पहायला मिळतोय.

दरम्यान, लंडनमध्ये राहणारे पाकिस्तानी वंशाचे वकील राशीद असलम यांनी पाकिस्तानी वकील खवर कुरेशी यांच्यावर हल्लाबोल केलाय. कुरेशी यांनी बाजू मांडण्यासाठी ९० मिनिटे असताना ५० मिनिटेच वापरली, यावर त्यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा