Top News

‘या’ देशाने पबजी गेमवर घातली बंदी

इस्लामाबाद | सध्या अनेक देशांमधील तरूणांना एका ऑनलाईन गेमने भूरळ घातली आहे. ही गेम म्हणजे पबजी. या गेमच्या व्यसनामुळे काही ठिकाणी चुकीच्या घडनाही घडल्या आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करत पाकिस्तान देशाने पबजी गेमवर बंदी आणली आहे.

पाकिस्तानने बुधवारी तरूणांचा लोकप्रिय ऑनलाइन बॅटल गेम ‘प्लेयर अननोन बॅटलग्राउंड’ अर्थात पब्जीवर तात्पुरती बंदी घातली. समाजाच्या अनेक स्तरांतून या गेमसंदर्भात विविध तक्रारी आल्यानंतर गेमवर तात्पुरती बंदी घातल्याची माहिती पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन ऑथोरिटीने ट्विटरद्वारे दिली आहे.

ही गेम एखाद्या व्यसनाप्रमाणे असून यामुळे मुलांच्या शारिरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर नकारात्मक परिणाम होत असल्याच्या अनेक गोष्टी आल्या होत्या. शिवाय या पब्जीमुळे तरुणांनी आत्महत्या केल्याचं वृत्तही आलं होतं. त्यानंतर गेमवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचं पीटीएने सांगितलंय.

या पबजी गेमसंदर्भात लाहोर उच्च न्यायालयात 9 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. सध्यातरी पाकिस्तानात या गेम साठीचा इंटरनेट अॅक्सेस बंद करण्यात आलाय. पाकिस्तानशिवाय जॉर्डन, इराक, नेपाळ, इंडोनेशियातील काही भाग आणि भारताच्या गुजरातमध्येही पबजीवर बंदी घालण्यात आलीये.

ट्रेंडिंग बातम्या-

“सर्व मंत्र्यांचा ब्रेन लॉक झालाय, भाजपचं सरकार असतं तर कोरोनाबाबत अशी परिस्थिती उद्भवली नसती”

लिओनेल मेस्सीचा आणखी एक विक्रम, कारकिर्दीत 700 व्या गोलची नोंद

महत्वाच्या बातम्या-

सोन्याच्या दराने गाठला ऐतिहासिक उच्चांक; प्रतितोळा सोनं 50 हजारांच्या पार

चौथीची पोरगी सांगेल, ठाकरे सरकारचं काही खरं नाही- चंद्रकांत पाटील

राज्यभरातील खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेणार- राजेश टोपे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या