बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भारताला हारव नाहीतर तुला पाकिस्तानात एन्ट्रीच नाही’; सामन्याआधी बाबर आझमला धमकी

नवी दिल्ली | आयपीएलचा थरार संपल्यानंतर आता विश्वचषक स्पर्धेसाठी चाहत्यांना उत्सुकता लागून आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 विश्वचषक स्पर्धेला रविवारपासून सुरूवात होणार आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी सर्व देशाचे खेळाडू आता युएईमध्ये दाखल झाले आहेत. भारत पाकिस्तानचा सामना 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारत-पाक सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी नेहमी उत्साही असतात. अशातच आता पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला हा सामना होण्याआधी एक धमकी मिळाली आहे.

बाबर आझमने युएईमध्ये दाखल होण्यापूर्वी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. आम्ही युएईसाठी निघतोय. तुमचे सर्मथन हेच आमच्यासाठी सर्वकाही आहे. आमच्या पाठीशी उभे राहा. आम्हाला सर्मथन करत राहा. आमच्यावरील विश्वास कायम राहु द्या आणि आमच्या विजयासाठी प्रार्थना करा, असं आझमने म्हटलं आहे. या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

भारत पाक क्रिकेट सामना म्हटलं की, खेळाडूंसोबतच चाहत्यांमध्येही शाब्दिक वाद रंगतात. बाबर आझमने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये एका नेटकऱ्यांनी धमकीवजा प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तान संघाला 24 ऑक्टोबर रोजीचा सामना जिंकवून दे. नाहीतर तुला घरी येऊ दिले जाणार नाही. चाहत्याने अशा प्रकाराची धमकी दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, आयपीएल 2021 संपल्यानंतर भारतीय संघ लगेचच युएईच्या ह़ॉटेलमध्ये दाखल झाला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ पाकिस्तान विरूद्ध 24 तारखेला मैदानात उतरणार आहे. त्यामुळे टी-20 विश्वचषकामध्ये भारतीय संघ पाकविरूद्ध विजयाची परंपरा सुरूच ठेवणार आहे का? ते आता पहावं लागणार आहे.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या-

‘माझं शरद पवारांना आव्हान आहे की…’; किरीट सोमय्यांचं पवारांना खुलं आव्हान

भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी सानिया मिर्झाचा मोठा निर्णय! व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचं पुण्यात जल्लोषात स्वागत; पाहा व्हिडीओ

“बाळासाहेब ठाकरे खरे हिंदूवादी, राज ठाकरे यांच्यात बाळासाहेबांची छबी दिसते”

पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले असतानाच केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More