बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची बीसीसीआयला धमकी, लिहून द्या नाहीतर…

नवी दिल्ली| भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध वेळोवेळी सुधारतात आणि खराब होत असतात. राजकीय संबंधावर या दोन्ही देशांचे सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध ठरतात. दोन्ही देशांच्या क्रिकेट सामन्यात हे संबंध उफाळून येतात. सर्वात रोमांचकारी असतो तो भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामना. प्रत्येक भारतीय या सामन्याची आतुरतेने वाट पाहत असतो. पण आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या आडमुठेपणामुळे या सामन्याचा अनुभव क्रिकेटचाहत्यांना घेता येऊ शकणार नाही, अशी चिन्हे आता दिसत आहेत.

2021 चा टी-20 विश्वचषक यंदा भारतात खेळवला जाणार आहे. आयसीसीचे अधिकृत विश्वचषक स्पर्धा वगळता, भारत पाकिस्तानशी क्रिकेट सामने खेळवत नाही. यंदाच्या या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान संघ भारतात येणार आहे. या स्पर्धेसाठी फक्त खेळाडूच नव्हे तर अधिकारी आणि पत्रकारांनाही व्हिसा देण्यात यावा, अशी मागणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन एहसान मणी यांनी केली आहे.

आम्ही या संदर्भात आयसीसीला विंनती केली की, भारताकडून या संदर्भात लेखी हमीपत्र मार्चपर्यत मिळायला हवं. हे हमीपत्र न मिळाल्यास टी-20 विश्वचषक आम्ही युएईमध्ये हलवण्याची मागणी करू, अशी सरळ शब्दात बीसीसीआयला एहसान मणी यांनी धमकी दिली आहे.

दरम्यान, 2016 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघ भारतात आला होता. या स्पर्धेचे नियोजन भारताकडे होते. त्यावेळी भारत आणि पाकिस्तान मधील राजकीय संबंध बिघडले होते. फक्त पाकिस्तानच्या खेळाडूंना भारतासाठी व्हिसा दिला गेला होता. त्याच बरोबर भारत-पाकिस्तान सामना नियोजित ठिकाणाहुन हलवण्यात आला होता.

थोडक्यात बातम्या-

अहमदनगर जिल्ह्यातील नेत्यांना सेटलमेंटची सवय लागली आहे- सुजय विखे

पेट्रोल, डिझेल दरवाढीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या…

“शिवाजी महाराज होणे शक्य नाही पण सव्वाशे कोटी देशवासी ‘सेवाजी’ बनू शकतात”

गुंड गजा मारणे फरार, पोलिसांची पथकं घेत आहेत शोध

पुण्यात पुन्हा गुंडांची दहशत, तरुणावर झालेला हल्ला सीसीटीव्हीत कैद, पाहा व्हिडीओ

 

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More