कोरोना खेळ विदेश

पाकिस्तानी खेळाडूंच्या मानगुटीवर कोरोना, या खेळाडूंना झाली लागण

पाकिस्तान | जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनानं आता पाकिस्तानच्या क्रिकेट संघातही शिरकाव केला आहे. शादाब खान, हारिस रऊफ आणि हैदर आली या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून यासंबंधी माहिती देण्यात आली आहे.

इंग्लड दौरा सुरू होण्याच्या आधी रावलपिंडी येथे सर्व पाकिस्तानी खेळाडूंची कोरोना चाचणी घेण्यात आली. यादरम्यान तीन खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटीव्ह आला आहे. मात्र या खेळाडूंमध्ये कोरोनाची कसलीही लक्षणं आढळून आलेली नाहीत. आता या खेळाडूंना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. असं क्रिकेट बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

कोरोनाचं संकट अद्याप कायम असताना पाकिस्तान व इंग्लंड यांच्यात टी-२० व कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. २८ जूनला पाकिस्तानी खेळाडू यासाठी इंग्लंडला रवाना होणार आहे.

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट संघातील खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटीव्ह आला असतानाच माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीलाही कोरोनाची लागण झाली आहे. ‘माझ्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा’ असं ट्विट करत त्यानं यासंबंधी माहिती दिली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

तुकाराम मुंढेंच्या आयुष्यात पहिल्यांदाच गैरव्यवहाराचा आरोप, महापौरांनी उचललं मोठं पाऊल!

सुशांतच्या दोषींना सोडणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा शब्द

महत्वाच्या बातम्या-

आता लग्न आणखी ‘मंगल’ होणार, राज्य सरकारकडून या गोष्टीला परवानगी

ऑनलाईन वर्ग कसे सुरू आहेत, मुख्यमंत्र्यांकडून पाहणी तसंच विद्यार्थ्यांशी संवाद

भारत-चीन संघर्ष, राजनाथ सिंग यांनी रशियाकडे केली ही महत्त्वाची मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या