बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाकिस्तानचा कोच मॅथ्यू हेडन म्हणतो, भारताचे ‘हे’ दोन खेळाडू डोकेदुखी ठरणार

मुंबई | सध्या टी ट्वेंटी विश्वचषकाची सर्वत्र एकच चर्चा होत आहे. प्रत्येक संघ आपल्या संपूर्ण ताकदीनिशी स्पर्धेत उतरणार आहे. तब्बल 5 वर्षांनी हा विश्वचषक होत आहे. भारताला 2007 नंतर एकदाही या स्पर्धेचं विजेतेपद पटकावता आलं नाही. मात्र यावेळी भारत आपल्या सर्वात ताकदवान खेळाडूंना घेऊन मैदानात उतरला आहे. आता भारतीय संघाची धास्ती पाकिस्तानच्या मार्गदर्शकानं सुद्धा घेतली आहे.

पाकिस्तान संघाला सध्या जागतिक ख्यातीचा फलंदाज मॅथ्यू हेडन मार्गदर्शन करत आहे. हेडननं भारतीय खेळाडूपासून पाकिस्तान संघाला धोका असल्याचं म्हटलं आहे. भारतीय सलामीवीर के.एल राहुल आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत या दोन खेळाडूपासून पाकिस्तानला धोका असल्याचं हेडननं कबूल केलं आहे. केएल राहुल आपल्या सर्वोत्तम फाॅर्मात आहे तर पंत धोकादायक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे.

मी के.एल राहुलला फलंदाजी करताना जवळून पाहिलं आहे. त्याची फलंदाजी मी छोट्या छोट्या स्वरूपात पाहिली आहे. तो पाकिस्तानसाठी धोकादायक ठरू शकतो, असं हेडन म्हणाला आहे. पंत सुद्धा कोणत्याही गोलंदाजाला सहज सीमेपार षटकार ठोकू शकतो परिणामी पंतला जर लवकर बाद नाही केलं तर पाकिस्तानसाठी तो डोकेदुखी ठरू शकतो, असंही हेडन म्हणाला आहे.

दरम्यान, भारताचा सलामीवीर केएल राहुल सध्या जबरदस्त फाॅर्मात आहे. अनेक जागतिक ख्यातनाम माजी क्रिकेटपटू राहुलच्या फलंदाजीचे चाहते बनले आहेत. केेे.एल राहुलचा फाॅर्म पाहाता तो विश्वचषकादरम्यान चौकार-षटकारांची बरसात करू शकतो.

थोडक्यात बातम्या

“समीर वानखेडेचा बाप बोगस होता, तुला तुरूंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही”

पुण्यातील बँकेवर फिल्मी स्टाईल दरोडा, घडनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद; पाहा व्हिडीओ

‘फडणवीसांची जिरवायची होती’?; वडेट्टीवारांच्या दाव्यावर नितीन गडकरींचं प्रत्युत्तर

‘शेतकऱ्यांची अडवणूक केली तर याद राखा…’; अजित पवारांचा थेट इशारा

वर्ल्ड कपआधी न्यूझीलंडला मोठा धक्का! संघातील ‘हुकमी एक्का’ जखमी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More