पाकिस्तानची हिंमत वाढली, आता भारतावर ग्रेनेड हल्ला!

संग्रहित

श्रीनगर | जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये काल करण्यात आलेल्या मिसाईल हल्ल्यानंतर आता पाकिस्तानची हिंमत वाढल्याचं दिसतंय. भारतीय हद्दीत दहशतवादी घुसवून ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. 

पुलवामा सेक्टरमधल्या काकापोरा इथल्या सैन्य तळावर हा हल्ला करण्यात आला आहे. सुदैवानं यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. 

दरम्यान, राजौरी आणि पूँछमध्ये पाकिस्तानकडून मिसाईल डागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या हल्ल्यात एका कॅप्टनसह भारताचे 4 जवान शहीद झालेत.