बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाकिस्तानने टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताची विजयाची परंपरा अखेर मोडीत काढली

मुंबई | टी-20 आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेत भारताची सलामीवीर जोडी स्वस्तात माघारी परतली. त्यामुळे भारताला पाकिस्तान समोर फक्त 152 धावांचं लक्ष्य ठेवता आलं. प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या सलामीवीरांनी भारताच्या गोलंदाजांचा समाचार घेत हा सामना आपल्याकडे झुकवला आणि भारताचा 10 गडी राखून पाकने पराभव केला.

पाकिस्तानने प्रथम नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण दिलं. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताची सुरूवात खराब झाली. रोहित शर्मा आणि के.एल. राहुल झटपट बाद झाल्यानंतर विराट कोहलीने एकहाती किल्ला लढवत संघाला 151 धावापर्यंत पोहोचवून दिलं. यामध्ये रिषभ पंतने देखील 38 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. त्या अगोदर पाकिस्तानच्या शाहिन आफ्रिदीने घातक गोलंदाजी करत भारताच्या 3 फलंदाजांना माघारी धाडलं होतं.

प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या सलामीवीर जोडीने भारताच्या गोलंदाजांना यशस्वी ठरू दिलं नाही. बाबर आझमने 66 तर मोहम्मद रिझवानने 78 धावांची खेळी केली. या सलामीवीर जोडीने 152 धावांची विजयी भागिदारी रचली. यामध्ये बाबर आझमने 6 चौकार आणि 2 षटकार लगावले. रिझवानने 3 षटकार आणि 6 चौकार लगावले.

दरम्यान, भारत या नंतर न्युझीलंडसोबत 31 तारखेला सामना खेळणार आहे. भारतीय सलामी जोडी आजच्या सामन्यात अपयशी ठरली असली, तरी पुढच्या सामन्यात त्याच्या खेळण्याची अपेक्षा देशवासीयांना लागुन राहिली आहे. पाकिस्ताननं भारताविरूद्ध विजय मिळवत सततची पराभवाची परंपरा मोडित काढली आहे.

थोडक्यात बातम्या-

“तरी नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये”

“ईडी म्हणजे पान तंबाखुचं दुकान झालंय, समझनेवालों को इशारा काफी होता है”

“आरक्षण मिळू द्यायचं नाही आणि निवडणुकीत या मुद्द्याचा वापर करायचा”

“काँग्रेसची धुणीभांडी करणाऱ्यांनी मोठ्या बाता करू नये”

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More